शेतकरी आयडी Farmer ID काढून तुम्ही 20 योजनाचा लाभ अगदी सहज घेऊ शकता.

देशात आणि राज्यात आज ६० टक्के लोकसंख्या यांचा मुख्य व्यवसाय हा शेत आणि शेतीशी निगडित जोडधंदा आहे. केंद्र आणि राज्य शासनामार्फत विविध योजना राबवल्या जात आहे ह्या योजना वेगवेगळ्या विभागामार्फत असतात. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत शासनामार्फत करण्यात येते . शेतीशी निगडित अवजारे, बी बियाणे , खते योजनेमार्फत पुरवले जातात . या आणि अशा ऐकून २० योजनेचा लाभ महाराष्ट्र शासन आता ऐकाच ठिकाणी देणार आहे. या योजनेस अर्ज करणे प्रक्रिया पण अतिशय सुलभ करण्यात आली. त्याचा लाभ तुम्ही शेतकरी आयडी (Farmer ID खात्यावरील घेऊ शकता. त्या नेमक्या कोणत्या योजना आहेत आणि त्याचा लाभ कसा घ्यावा या विषयी माहिती देणारा हा लेख.

शेतकरी आयडी Farmer ID
शेतकरी आयडी Farmer ID

राज्यतील शेतकऱ्याना विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या विभागामध्ये जाऊन अर्ज करावा लागत होता, त्यामध्ये त्याचा जास्त वेळ जात होता, ऑनलाईन सेवा देणारे आणि दलाल त्यांच्या कडून अधिक पैसाची मागणी करतात त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते, त्याच बरोबर प्रत्यक्ष लाभार्थी पर्यंत लाभ पोहचेल की नाही याची शास्वती नाही, या सगळ्या पासून सुटका मिळावी म्हणून आणि ऐकाच ठिकाणी अनेक योजनेचा लाभ मिळावा या हेतु ने शेतकरी आयडी तयार करण्याचे निर्णय शासनाने घेतला . सध्या ह्या खात्यावर कोणकोणत्या योजनेचा लाभ मिळतो त्या योजनांची यादी खाली दिली आहे.

शेतकरी आयडी म्हणजे काय ?

शेतकरी आयडी (Farmer ID) महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी विकसित केलेले एक अद्वितीय डिजिटल ओळखपत्र असून हे ओळखपत्र AgriStack Maharashtra Farmer Registration (MHFR) या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे तयार करून प्रदान केले जाते,शेतकरी आयडी (Farmer ID) शेतकऱ्यांना त्यांच्या कृषीविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी एकसंध व कार्यक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे आहे. या शेतकरी आयडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना, अनुदान, पीक विमा, जमिनीच्या नोंदी, आणि इतर कृषी-संबंधित माहिती तसेच सुविधा सहज आणि जलदगतीने मिळवता येतात. या ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांचे डिजिटल नोंदीकरण होते आणि ज्यामुळे त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे एकाच ठिकाणी ठेऊन अर्ज प्रक्रिया करणे अतिशय सुलभ होते. तसेच, या आयडीमुळे शेतकऱ्यांची ओळख प्रमाणित होऊन, त्यांना शेतीशी संबंधित आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य मिळण्यास मदत होते, शेतकरी आयडी (Farmer ID) मुळे प्रत्यक्ष पात्र लाभार्थीला योजनेचा लाभ मिळतो आणि त्याचे जीवनमान उंचवण्यास मदत होते.

शेतकरी आयडी (Farmer ID) मार्फत कोणकोणत्या योजनाचा लाभ घेता येतो.

महाराष्ट्र राज्यात शेतकरी आयडी (Farmer ID) प्रदान करण्यास सुरुवात 15 एप्रिल 2025 पासून झाली. आता 20 योजनाचा लाभ या शेतकरी आयडी (Farmer ID) चा वापर करून mahaDPT या शासनाच्या अधिकृत वेबसाइट मार्फत दिल्या जात आहे. पुढील काही महिन्यात शेतकाऱ्यांशी निगडीत असलेल्या सर्वच योजनाकहा लाभ शेतकरी आयडी (Farmer ID) मार्फत देण्यात येणार असल्याचे शासनानामार्फत सांगितल्या जात आहे.

खालील टेबल मध्ये विभागनिहाय योजनांची यादी दिली आहे जी शेतकरी आयडी (Farmer ID) मार्फत दिल्या जाते.

अनूविभागयोजनांचे नाव
1कृषी यांत्रिकीकरणकृषी यांत्रिकीकरण उप-अभियान
2राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना
3राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस
4एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
5राष्ट्रीय कृषी विकास योजना – रफ्तार
6सिंचन साधने व सुविधाप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रती थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन घटक)
7राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस
8राष्ट्रीय कृषी विकास योजना – रफ्तार
9मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
10बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खतेराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस
11राष्ट्रीय कृषी विकास योजना – रफ्तार
12फलोत्पादनएकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
13भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
14राष्ट्रीय कृषी विकास योजना – रफ्तार
15मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
16अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजनाबिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (आदिवासी उप योजना / आदिवासी उप योजना बाह्य)
17डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
18राष्ट्रीय कृषी विकास योजना – रफ्तार
19मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
20सौरकुंपणडॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना
शेतकरी आयडी काढण्यासाठी लिंक येथे क्लिक करा
शासकीय नोकरी & योजना ग्रुपयेथे क्लिक करा
योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून अपंग व्यक्तींना प्रोत्साहन पर अपंग कल्याण राज्य पुरस्कार  व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (क्लिक करून) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top